घरदिव्यांत मंद तरी बघ, अजून जळते वात; उजळल्या दिशा, सजणा, न कळतांच सरली रात ! झाडतां झडेना या लोचनांतली पण धुंद. सर्व रात्रभर निजला, जिवलगा, कळींत सुगंध ! जवळपास वाटेनें सुभग चालली कोणी : वाजतें तिच्या भरल्या घागरींतलें पाणी. निवळलें, तरी दिसतो पुसट एक हा तारा; बघ, पहाटचा सुटला मधुर उल्हसित वारा ! उगिच हासतें माझें ललित अंतरंग, सख्या ! उमलल्या फुलांमधले हालले पराग, सख्या ! झोप तूं : मिठीमधला अलग हा करूं दे हात; उलगडूं कशी पण ही तलम रेशमाची गांठ?