घास घे रे तान्ह्या बाळा । गोविंदा गोपाळा । भरवी यशोदामाई । सांवळा नंदबाळ घेई ॥ घेई कोंडा-कणी । त्रैलोक्याच्या धणी । विदुराघरींचा । पहिलावहिला घास ॥ पोहे मूठभरी । क्षीराब्धीच्या हरी । मैत्र सुदामजीचा । आला दुसरा घास ॥ थाळी एक्या देठी । घ्यावी जगजेठी । द्रौपदीमाईचा । आला तिसरा घास ॥ उरल्या उष्टावळी । फळांच्या वनमाळी । शबरी भिल्लिणीचा । घ्या हो चवथा घास ॥ टाकू ओवाळून । मुखचंद्रावरून । गोविंदाग्रजाचा । उरलासुरला घास ॥