घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥ डोळे तुह्मी घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥ तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥ मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥४॥ रूपीं गुंतले लोचन । पायीं स्थिरावले मन ॥५॥ देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥ तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥