PrintSource

घेऊन मैफलीचा रात्रीतला

Gheun Maiphalicha Ratritala

जगदीश खेबूडकर

घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा
इष्कात धुंद सारे, हा रंग आज न्यारा

डोळ्यांतले शराब, ओठांतला गुलाब
कैफात डोलतो हा वेडा कुणी नबाब
सुरईतल्या सुधेची पेल्यात ओत धारा

पायातुनी उठावा झंकार पैंजणांचा
गाण्यात सूर नाचे बेफाम भावनांचा
दाही दिशादिशांत खेळे गुलाबवारा

ही बाग यौवनाची आली जणू भराला
ही रात्र पौर्णिमेची भरतीच सागराला
वेड्या मुशाफिरा तू शोधू नको किनारा