गिरिधरापुढे या नाचिन मी
गिरिधरापुढे या नाचिन मी नाचून रिझवीन प्रिय रसिकाला प्रेमीजनांना दुखवीन मी प्रीतीची घालून घुंगुरे रतीवसने परिधानीन मी गिरिधरापुढे या नाचिन मी लोकलाज कुलमर्यादा पैकी काही न ठेवीन मी गिरिधरापुढे या नाचिन मी रायाच्या पहुडेन पलंगी रंगे मीरा हरीप्रेमी गिरिधरापुढे या नाचिन मी