गोकुळ सोडुन गेला माधव
गोकुळ सोडुन गेला माधव, उभा वाहतो वारा उदास झाले गोकुळवासी, धेनू न शिवती चारा कुंजवनीच्या कळ्या जळाल्या फुलल्यावाचून देठी करपुन गेली बीज-बियाणे भूमातेच्या पोटी शुकपिकांच्या कंठी झाले सूर थिजुनिया गारा वार्धक्याची खचली कंबर, तरुणपणा हो वेडा उंबरठ्याच्या आतच खचला बाळपणाचा गाडा लावण्याची झडे नव्हाळी गाव गहिवरे सारा