गोरीगोरीपान फुलासारखी
गोरीगोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण गोर्यागोर्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण ! वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान ! वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्याच्यापरी होऊ दोघे आम्ही सान !