PrintSource

इये मराठीचिये नगरी

Iye Marathichiye Nagari

वसंत कानेटकर

इये मराठीचिये नगरी
रामराम मंडळी, या हो अमुच्या घरी

गोड करा गूळपाणी, शाळूची भाकरी
कृष्णेच्या पाण्याला गंगेची माधुरी

प्यार अम्हां त्यागाची शौर्याची शाहिरी
भावभुकेले आम्ही, आमुची भारत ही पंढरी