जा जा जा रे नको बोलू
जा जा जा रे नको बोलू जा ना ! जा जा मीही भिते काय कोणा? आधी स्वत: केला गुन्हा जोरा तुझा का रे पुन्हा सांग ना? माझे मन वारा भवती फिरणारा झुरतो झुरणारा क्षणा क्षणा स्वैर मी वाहते मुक्त मी चेतना ! मी रे फुललेली वासंतिक वेली सुमने भुलवावे कुणा कुणा गंध का कोणत्या मानितो बंधना?