Back
Fitting…

1 page

जा जा रानीच्या पाखरा तू

जा जा रानीच्या पाखरा, तू जा रं भरारा
तुला घालिते चारा, तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा !

दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव
तिथं नांदतोया देव नरसुबाराव
लहानथोरांसी मायेचा त्योच आसरा !

बाई म्हायेराचं थोरपन वानु कसं?
पुण्यवंत माझं मायबाप देव जसं
गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा !

माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला
पड पाया तिच्या, सांग येती याद मला
तुला भेटाया हुतो माझा जीव घाबरा !

जा जा रानीच्या पाखरा तू

जा जा रानीच्या पाखरा, तू जा रं भरारा
तुला घालिते चारा, तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा !

दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव
तिथं नांदतोया देव नरसुबाराव
लहानथोरांसी मायेचा त्योच आसरा !

बाई म्हायेराचं थोरपन वानु कसं?
पुण्यवंत माझं मायबाप देव जसं
गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा !

माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला
पड पाया तिच्या, सांग येती याद मला
तुला भेटाया हुतो माझा जीव घाबरा !

जा जा रानीच्या पाखरा तू

जा जा रानीच्या पाखरा, तू जा रं भरारा
तुला घालिते चारा, तुला घालिते चारा
द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा !

दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव
तिथं नांदतोया देव नरसुबाराव
लहानथोरांसी मायेचा त्योच आसरा !

बाई म्हायेराचं थोरपन वानु कसं?
पुण्यवंत माझं मायबाप देव जसं
गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा !

माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला
पड पाया तिच्या, सांग येती याद मला
तुला भेटाया हुतो माझा जीव घाबरा !