जाग बन्सिधरा जाग, जाग नंदलाला सरली रात ये पहाट मिटली चंद्रशाला घराघरात आहट ये, उघडली कवाडे सळसळतो पिंपळ ती झुळुक झुलवी झाडे चिवचिवती भूपाळी तुज विहंगमाला गिरीवरती पुसट दिसे अरुण रंगमाला आली उन्हे अंगणात विणत किरणजाला दर्शनास आतुरली उठी उठी गोपाला