जादुगारिणी सखे साजणी
जादुगारिणी सखे साजणी थांब जराशी ग प्रेमभाव नजरेत दाविले तूच आधी मज नादी लावले गोड हसुनिया हृदयी फुलवल्या गुलाब-राशी ग तुझ्या संगती गिरिकंदरही राजमंदिराहुन सुखदायी तू माझी तर तुच्छ अवांतर सौख्य-मिराशी ग दोन जिवाचे जातक जुळले भाग्यलेख प्रीतिने उजळले जगास मानू उगा, जुमानू का ग्रहराशी ग स्फूर्ति-तारका तू झगमगती करू जोडीने प्रवास जगती सदा बिलगली हीच एकली आस उराशी ग