PrintSource

जगणे अमुचे नका विचारू

Jagane Amuche Naka Vicharu

अण्णा जोशी

कधी आम्ही गार सावली चाखितो
कधी उन्हाच्या चटकी
जगणे अमुचे नका विचारू आम्ही पाखरे भटकी

बालपणी बल करांत नव्हते
निराधार ते जीवन होते
जोवर होती आई चोचिण्या कण्या-बाजरी-मटकी

पंख पसरिता उडण्यापुरते
मग घरट्यातील जीवन सरते
चिवचिव करिता कोण ऐकतो साद आमुची लटकी?

पुरे जाहले जातो आता
शोधित फिरतो अपुला दाता
वेळेवर धावेल आमुच्या संकटांचिया घटकी