PrintSource

जाहली जागी पंचवटी

Jahali Jagi Panchavati

ग. दि. माडगूळकर

जाहली जागी पंचवटी
कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी

पहाटवारा सुटला शीतळ
अंब्यावरती बोले कोकिळ
तापसबाळा जळा चालल्या कुंभ घेउनी कटी

सडा शिंपण्या आश्रमांगणी
कवाड उघडी जनकनंदिनी
उभा पाहिला दीर लक्षुमण राखित पर्णकुटी

बघुन तयाची निष्ठा-प्रीती
जानकी नयनी जमले मोती
त्या मोत्यांचा सडा सांडला भूमीवर शेवटी