जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन । भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥ त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥२॥ तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥३॥ जाणती हे खूण स्वात्म अनुभावी । तुका ह्मणे पदवी ज्याची त्याला ॥४॥