जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !' मी जातां राहिल कार्य काय? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल; तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल कांहि का अंतराय? मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल कुणा काळजी कीं न उमटतिल, पुन्हा तटावर हेच पाय? सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामिं लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल मी जातां त्यांचें काय जाय? अशा जगास्तव काय कुढावें ! मोहिं कुणाच्या कां गुंतावें? हरिदूता कां विन्मुख व्हावें? कां जिरवुं नये शान्तींत काय?