जनी ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥ कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥ कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद । कां राहिला ॥३॥ कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा । येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥