PrintSource

जाशि कुठे नवनित-चोरा

Jashi Kuthe Navneet Chora

अण्णा जोशी

मुरलीधर चित्तचकोरा रे
जाशि कुठे नवनित-चोरा रे

आज तुझी ना होईल सुटका
फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता तुझ्याभोवती घेरा रे

असेल राधा गौळण वेडी
करू नको अमुच्याशी खोडी
सांगताच येईल यशोदा हाती घेउनि झारा रे

ऐक सांगते अता शेवटी
मंजुळ पावा धरुनी ओठी
घुमवशील तेव्हाच तुला रे सोडू नंदकुमारा रे