PrintSource

जाशिल कोठे मुली तू

Jashil Kothe Muli Tu

ग. दि. माडगूळकर

जाशिल कोठे मुली तू?
नेशिल तेथे मुला तू !

नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्‍नात ने, यक्षभूमीवरी
स्वप्‍न कोठे वसे? त्यात जावे कसे?
हात हाती धरी संगती चाल तू !

प्रीतीचा प्रांत का अजून ना लागला
भृंग गाती पहा चुंबताना फुला
वृक्ष आणि लता, डोलती बिलगता
पाहुनी घे गडे प्रीतीची रीत तू !

आनंद लाभे मना-लोचना
प्रीतीमुळे ही फुले भावना
ती कथा राहिली, प्रीत ना पाहिली
पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू?