जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥ सेना ह्मणे खूण सांगितली संतीं । या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥