जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना या ऋणाची विस्मृती ती ना कधी होवो मना ! कां मुळीं कोणी करावें प्रेम एखाद्यावरी? हें तुझें सौजन्य पाणी आणितें या लोचना शक्तिच्या राज्यांत सक्ती शोभते, शोभो तिथें ! प्रीतिला स्वातंत्र्य आधी पाहिजे, कां होय ना? आपुल्यामध्यें मध्यें पडूं दे शैलराजी सह्य ही भेटती दूरांतरे सप्रेम कृष्णा-कोयना ! चाललो एका दिशेनें थोडकें का हे असे? सागरी एकाच भेटू अंतकाली मोहना !