जीवनाच्या या फुलाला
जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे वेदना ही जाळणारी चंदनाला पोळणारी चंपकाच्या विंझणाचा तप्त वारा झोंबताहे चांदण्याचा ताप वाटे वेदनेचा सूर दाटे कर्पूराचे कुटील काटे बोचती हे, विरह दाटे वाट त्याची पाहताहे पाहताना रंगत आहे अमृताच्या जीवनी या आसवांचा पूर वाहे