जीवित माझे हवे तुला तर, घेऊन जा तू आता सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा संसाराची पूजा जाशी उधळून अर्ध्यावरती मंगल मी रे रचिले देऊळ तुझ्याच मूर्तीभवती अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता तुझ्यासवे तो हर्षही गेला, खेदही उरला नाही पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही कुंकुमतिलक भूषण भाळी, इतुकेच नाथा देई मिळेल मजला भाग्य सतीचे, तूही जवळी नसता