PrintSource

जेथुनि उद्गार प्रसवे

Jethoni Udgar Prasave

संत निवृत्तीनाथ

जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधर गोकुळीं वसे ॥१॥

जनक हा जगाचा जिवलग साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥

नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥

निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥