झरा प्रीतीचा का असा
झरा प्रीतीचा का असा आटतो रे? कशी काय बोलू गळा दाटतो रे ! तुझे लग्न झाले असे ऐकले मी तुझे नाव तेव्हा दुरी टाकले मी जिव्हाळा पुन्हा का तुझा वाटतो रे ! मिळे सागरासा पती त्या सतीला मुळी डाग नाही तुझ्या इज्जतीला उरी जाळ माझ्या उगा पेटतो रे ! जळे जीव जैसी वडी कापराची अपेशी जिण्याला कळा ये धुराची इमानास धोका कसा भेटतो रे !