झटकून टाक जीवा दुबळेपणा
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा का कालचा उद्याला देसी उगा हवाला द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा