झिंगतो मी कळेना कशाला जीवनाचा रिकामाच प्याला ! काढली रात्र जागून सारी चंद्र माझा सकाळीच आला ! दूर झाले फुले वेचणारे वेचतो मी फुलांतील ज्वाला 'काय झाले पुढे आसवांचे?' हे विचारू नये सांत्वनाला गाव सारेच हे तोतयांचे नाव माझे विचारू कुणाला?