PrintSource

झुळझुळे नदी ही बाई

Jhula Jhule Nadi Hi Bai

कवी संजीव

झुळझुळे नदी ही बाई
देहलतेला शीतल करुनी आनंदाने गाई

पानफुलांनी तरुवर फुलती
पाण्यावरती तरंग झुलती
सुरेल मुरलीनादे घुमते ती अंब्याची राई

सुखात का ग खुपते काही?
श्याम सावळा भेटत नाही
राधेला का छळिती गोपी, कळत कसे ग नाही

या पाण्यावर हृदय उमलते
हृदयातुनी का गुपित उकलते
नको गुपित ते उकलाया ग, अबोलीच मी राही