झुलतो झुला जाई आभाळा
झुलतो झुला, जाई आभाळा झुल्यासंगे झुलताना खुलतो ग बाई गळा ! लिंबाच्या फांदीला झुला मी बांधिला रेशमाचे लाल गोंडे माझ्या झुल्याला ! खालती वरती वार्याला भरती विमानांच्या वेगे माझा झुला चालला ! झुल्याच्या संगती सूरही रंगती वारा नेई माझे गाणे दूर देशाला !