PrintSource

झुलविले मला का सांग ना

Jhulavile Mala Ka Sang

दत्ता डावजेकर

झुलविले मला का सांग ना
करुनिया जिवाची वंचना?

ऐकण्यास नादमधुर
बोल तुझे गोड, चतुर
जीव सख्या होय अतुर
परि का जाशि तू निघुनी दूर
विरहिणी इथे ही अंगना

चंद्रमा नभांगणी
पसरवुनी मोहिनी
उमलविल्या मधु-नलिनी
परि का राहिलास लोपुनी
तुडवुनी हृदयीच्या बंधना?