झुंजुरमुंजुर पाऊस मार्यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्याहिरव्या धरेवरी आली रं बेगिन ये, साजणा ! ढगानं काळंनिळं आभाळ आनंदलं झाडाला पानाला, थेंब थेंब पाणी डसलं रं ही झर झर झर गारगार सर केसांच्या या जाळ्यामंदी आली रं बेगिन ये, साजणा ! डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं पिरतीनं धुंदीनं, अंग अंग माझं सजलं रं मी पाण्यात भिजुन, इथं थिजुन तुझ्यासाठी येडीपिशी झाले रं बेगिन ये, साजणा !