जिण्याची झाली शोककथा
काय ऐकिले, काय पाहिले, काय पुढे आता जिण्याची झाली शोककथा मी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी डोळ्यांपुढती दुनिया झाली तमाहून काळी तनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा अजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी वाफ होउनी उडुनी गेले डोळ्यांतील पाणी मला गिळाया गर्जत आला आठवणींचा जथा शुद्ध हरपली तरीही राही जिवंत जाणीव माझी लेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जाळी चालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा