का मोगरा फुलेना
बरसात चांदण्याची, वारा कसा हलेना का मोगरा फुलेना? डोळ्यांतल्या जळाने मी रोप थोर केले वाढीस लागला हा आले वसंत, गेले हिरवा दिसे पिसारा परि का कळी धरेना? माझ्या मनोगतांची हळुवार भावगीते भवती फिरून याच्या मी नित्य गात होते हिमशुभ्र हास्य कैसे याच्यावरी डुलेना? लागे ना थांग याचा, अजुनी न मौन सोडी आधीच धुंद झाले, मी मात्र गंधवेडी चुकते कुठे कुणाचे? माझे मला कळेना !