काल पाहिले मी स्वप्न
काल पाहिले मी स्वप्न गडे नयनी मोहरली ग आशा बाळ चिमुकले खुदकन हसले मीही हसले, हसली आशा काल पाहिले मी स्वप्न गडे भाग्यवतीचे भाग्य उजळले कुणीतरी ग मला छेडिले आणि लाजले, हळूच वदले रंग सावळा तो कृष्ण गडे इवली जिवणी इवले डोळे भुरुभुरु उडती केसही कुरळे रुणुझुणु रुणुझुणु वाजती वाळे स्वप्नी ऐकते तो नाद गडे