काय पुरुष चळले बाई । ताळ मुळीं उरला नाहीं । धर्म-नीति-शास्त्रें पायीं । तुडविती कसे हो ॥ साठ अधिक वर्षें भरलीं । नातवास पोरें झालीं । तरिहि नव्या स्त्रीची मेली । हौस कशि असे हो ॥ घोडथेरड्यांना ऐशा । देति बाप पोरी कैशा । कांहिं दुजी त्यांच्या नाशा । युक्ति कां नसे हो ॥ शास्त्रकुशल मोठे मोठे । धर्म-गुरुहि गेले कोठें? । काय कर्म असलें खोटें । त्यांस नच दिसे हो ॥