काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥ कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥ अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥ नामा ह्मणे यांनीं तारीले पतीत । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥