काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥ जतन हें माझें करोनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥२॥ घडलिया दोषांचे न घाली भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥३॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मागतां पाहीं दान दिलें ॥४॥ तुका ह्मणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥५॥