गहन अमेच्या गर्भातुनही चाहुल कोमल पुनवप्रभेची कडा रुपेरी काळोखाची नभ गिळलेले अंधाराने विश्व आंधळे केविलवाणे तरीही त्याला एकच आशा, धूसर लवलवत्या क्षितिजाची शिशिराचे साम्राज्य पसरले हिरवेपण पुरते वठलेले तरीही त्या वैराणी घुमते लकेर नाजुक तृणांकुराची दु:खांना सौख्याची झालर सुखावरी दु:खांची पाखर उमगून घे हे खंत नको मग, घडलेल्याची ना घडल्याची