कधिं करिती लग्न माझें
कधिं करिती लग्न माझें तुज ठावें ईश्वरा ॥ वाढली उंच ही किती । हंसुनि बोलती । नाक मुरडिती । स्त्रिया परभारां ॥ मैत्रिणी वदति टोंचुनी । शब्द ते मनीं । जाति भेदुनी । सुरीच्या धारा ॥ जनक तो नांव काढिना । माय सुचविना । हौस मग कुणा । कोण झटणारा ॥