कधी रे पाहिन डोळां तुला
कधी रे पाहिन डोळां तुला? सोनुल्या देवाघरच्या फुला कस्तुरी-हरिणाच्या उदरी हरीने साठविली कस्तुरी सुगंधे हरिणच वेडावला ! देव तू येशिल माझ्या घरी तुझ्यासह अमृत माझ्या उरी कधी ते भरविन बाळा तुला? फुला, तू संसारी मंगल फुला, तू फुलाहुनी कोमल करिन या तळहाताचा झुला