कधीतरी तुम्ही यावे इथे
कधीतरी तुम्ही यावे इथे या घरात कैक दिवस होता हेतू असा अंतरात शपथ तुमची ! आज भाग्य आले हाती तरी उरी वाटे भीती मनातले हितगूज सारे राहिले मनात शपथ तुमची ! जीव बावरे हा भोळा नीर दाटू पाहे डोळा बोल बोल ओठावरचा विरघळे मुखात शपथ तुमची ! मनी गुंफिलेल्या ओळी ओघळल्या ऐत्यावेळी सूर मात्र केवळ उरले गीत गायनात शपथ तुमची ! शपथ तुम्हा तुमची देवा मूक भाव जाणून घ्यावा पुन्हा नका लोटू मजसी स्वप्न चिंतनात शपथ तुमची !