काजळ रातीनं ओढून नेला
काजळ रातीनं ओढून नेला सये साजण माझा जीव ये भरुनी भिजते पापणी, कधी रे येशिल राजा पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तांत तुफान आलं सुसाट, माझा करून गेला घात कातरवेळी करणी झाली, हरवून गेला राजा सुकली फुलांची शेज राया, राहिला अर्धा डाव उधळून जाता खेळ वाया श्वासांनी तोडिला ठाव भुकेली ज्वानी जळते आतुनी, ये रे ये एकदा राजा