PrintSource

कमोदिनी काय जाणे

Kamodini Kaay Jane

संत तुकाराम

कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम ।
आह्मीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥

माते तृण बाळा दुधाचि ते गोडी ।
ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥

तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।
नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥४॥