कर आता गाई गाई
कर आता गाई गाई तुला गाते मी अंगाई आज माझ्या बाहुलीची झोप कुणी नेली बाई? बोळक्यांची उतरंडी लुटुपुटीची चूल आवरले आहे बाई आता कुठे घरकूल ! काम सारे उरकता थकला ग माझा जीव नको छळू तूही राणी येऊ दे ना जरा कीव? नीज नीज लडिवाळे नको रडू, देते झोका उभा बागुल दाराशी सांग त्यास बोलावू का?