करु देत शृंगार सख्यांनो
करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार जिवंत पती, मी सती जातसे भाग्य लाभले कुणा कधी असे मृदुल मृदुल तर या कमलाचा यज्ञी स्वाहाकार ही भाग्याची वेळ साजणी भांग भरा ग गुंफा वेणी राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रूधार मला न माहित कोण यवन तो कोण जाणते मृत्यु काय तो? हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार