PrintSource

कसा ग विसरू तो सोहळा

Kasa Ga Visaru To

वंदना विटणकर

क्षणाभोवती त्याच रंगतो अजून जीव खुळा
कसा ग विसरू तो सोहळा?

नजरभेट ती वीजबावरी
मनात घुमली धुंद बासरी
मिटल्या ओठांतुनी मनातील गंध फुलू लागला

झुकता खाली तुझी पापणी
हसली मेघांतुनी चांदणी
तुझ्या तनूवर मोरपिसारा मोहरून आला

घडून गेली क्षणांत किमया
ही मदनाची मंथर माया
बहरधुंद त्या स्वप्‍नघडीला चंद्र फितुर झाला