कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो? संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो कीर्तनी मान डोलतो परि कोंबडी-बकरी खातो वडीलजनाचे श्राध्द कराया गंगेमाजी पिंड देतो खोटा व्यापार जरा ना सोडी, तो देव कसा पावतो झालेले मागे पाप धुवाया देवापुढे नवस देतो तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी कोणीच ना मुक्त होतो