PrintSource

कशास रुसवा सखये धरिला

Kashas Rusava Sakhaye

कशास रुसवा सखये धरिला
गालावरच्या खळीत भरला
गोड तुझा कावा

ओठ पाकळ्या विलग जाहल्या
जाई-जुईच्या कळ्या बहरल्या
वदनी लाल अनुराग रंगला
खुलल्या गाली सखी मोहरला
गोड तुझा कावा

लाबाड डोळे लाडिक चाळे
भृधनू रोखुनी बघती लाडके
मदनबाण हा नयनामधला
अंतरी तुझिया मी ओळखला
गोड तुझा कावा