कशी गौळण राधा बावरली
कशी गौळण राधा बावरली ! जलभरणा यमुना गेली शीळ खुणेची अवचित आली रोमांचित काया थरथरली ! कृष्ण सावळा गोरी राधा कृष्णसख्याची जडली बाधा कृष्णच नेत्री, कृष्णच गात्री कृष्णात राधिका विरघळली ! लाजेचीही वसने फिटली लोकांमधुनी राधा उठली राधामोहन होता मीलन हरिकांति तनूवर पांघरली !