कशी काळनागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी ! प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधी. सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी. सुखी पाखरें गात चाललीं पार वादळीं सुधी. पैलतटिं न कां तृण मी झालें? तुडविता तरी पदीं ! पैलतटिं न कां कदंब फुललें? करिता माळा कधी. पापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्रावीणें वधी. प्राणाचें घे मोल नाविका, लावि पार, ने अधी !